मुंबई : बॉलिवूडचं एक भयंकर सत्य समोर आलं आहे. गायिका हेमा सरदेसाई यांनी बॉलिवूडबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. एका मुलाखतीत बोलतांना त्यांनी बॉलिवूडबाबतचे अनेक खुलासे केले आहे. संघर्षच्या काळात इंडस्ट्रीशी संबंधित अनेक जण त्यांचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला असं धक्कादायक वक्तव्य त्यांनी केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेमा सरदेसाई म्हणतात की, बॉलिवूड हे वाईट लोकांनी भरलं आहे. मला कोणी चांगला व्यक्ती भेटलाच नाही. मी ज्या स्टूडियोमध्ये गेली लोकांनी मला वाईट नजरेने बघितलं. त्यांना माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे होते. पण मी मानसिकरित्या खचली नाही. पण मी नेहमी संगिताची पूजा करते आणि त्याची प्रतिष्ठा कमी नाही होऊ देणार. आजपर्यंत माझा संगितात देवाचा वास आहे.


मुंबईमध्ये जन्म झालेल्या हेमा सरदेसाई यांनी मोठं यश मिळवलं आहे. जे खूप कमी गायकांच्या वाट्याला आलं आहे. त्या एकमेव गायिका आहेत ज्यांना १९८९ मध्ये जर्मनीमध्ये झालेल्या इंटरनेशनल पॉप साँग फेस्टिवमध्ये ग्रँड पिक्स अवॉर्ड मिळाला होता. त्यानंतर लता मंगेशकर यांना सोडून ५० व्या स्वतंत्र दिवसाला परफॉर्म करणाऱ्या त्या एकट्या गायिका आहेत.


हेमा यांनी खूपच कमी वयात गाणं सुरु केलं. तेव्हा त्या फक्त ८ वर्षाच्या होत्या. त्यांनी नवरात्र फेस्टिवलदरम्यान पहिल्यांदा स्टेज सिंगिंग केलं. लहानपणी शिक्षक आणि मित्र त्यांना 'हॅप्पी गो लकी गर्ल' बोलायचे. इंडस्ट्रीमध्ये आजही त्यांना अनेक जण या नावाने हाक मारतात.


हेमा या ४ अभिनेत्यांसोबत गाणाऱ्या पहिल्या गायिका आहेत. त्यांनी 'बागवान'मध्ये अमिताभ बच्चन, 'असंभव'मध्ये नसीरुद्दीन शाह, 'हम दो हमारे दो' मध्ये गोविंदा आणि 'जोश' मध्ये शाहरुख खान यांच्यासोबत गाणं गायलं आहे.