स्टंटवुमन गीताचा अंगावर काटा आणणारा संघर्ष
बॉलिवूडचे सेलिब्रिटीज कायमच ऐशोआरामात जगत असतात. एकदम सुखी जीवन जगत असतात असे आपल्याला वाटते. मात्र ह्या क्षेत्रात येण्यासाठी ते किती संघर्ष करतात हे कोणालाच माहित नसते. अशाच लाखो सेलिब्रिटीजमध्ये एक आहे गीता टंडन.
मु्ंबई : बॉलिवूडचे सेलिब्रिटीज कायमच ऐशोआरामात जगत असतात. एकदम सुखी जीवन जगत असतात असे आपल्याला वाटते. मात्र ह्या क्षेत्रात येण्यासाठी ते किती संघर्ष करतात हे कोणालाच माहित नसते. अशाच लाखो सेलिब्रिटीजमध्ये एक आहे गीता टंडन.
कसा घडला गीताचा बॉलिवूडमधील प्रवास
गीता ही बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी स्टंटवूमन आहे. मात्र तिचाही बॉलिवूडमध्ये एन्ट्री करतांनाचा प्रवास सोपा नव्हता.
१५व्या वर्षी लग्न झालेल्या गीताचे सासरकडून मात्र फार हाल झाले. सतत होण्याऱ्या अपमान व शारीरिक शोषणामुळे ती घरातून पळून गेली. सहसा अशा वेळी एकट्या पडलेल्या मुली वेश्याव्यवसायामध्ये जातात पण तिने त्याएवजी धुणी-भांडी करणे पसंत केले. त्यानंतर तिला स्टंटवुमनच्या नोकरीचे कळले.
कोणतेही प्रशिक्षण नसलेली गीता बॉलिवूडमधील एक यशस्वी स्टंटवुमन झाली आणि आता तिला देशातील पहिली अॅक्शन डायरेक्टर व्हायचेय.
गीताची ही कहाणी कोणलाही प्रेरणा देईल अशीच आहे. पाहा गीताच्या संघर्षाचा हा व्हिडिओ...