मुंबई :  नववर्षाची सुरूवात झी स्टुडिओच्या 'ती सध्या काय करते'ने दमदार सुरूवात केली आहे. गेल्या तीन दिवसात या चित्रपटाने तब्बल ५ कोटी ५० लाख रुपयांची भरघोस कमाई केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रासह गोवा, गुजरात कर्नाटक, मध्य प्रदेश दिल्ली, आंध्र प्रदेश हैदराबादमध्ये हा चित्रपट अनेक ठिकाणी हाऊसफुल्ल जात असून कमाईचे चांगले आकडे या ठिकाणाहून येत आहे. 


मोदी सरकारने नोटबंदीची घोषणा केल्यानंतर अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट आपटले होते. पण हिंदीत दंगल आणि आता मराठीत 'ती सध्या काय करते' या चित्रपटाने दाखवून दिले की  नोटबंदीचा चांगल्या चित्रपटांवर कोणताही परिणाम होत नाही. 


गेल्या वर्षी नटसम्राट या चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीचा पाया रचला होता. तर सैराटने सर्व रेकॉर्ड ब्रेक करत कळस गाठला होता. आता 'ती सध्या काय करते' ने २०१७ चा तीन दिवसात पाया रचला असून हे वर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी चांगले जाईल याचे संकेत दिले आहेत.