बर्लिन : सत्तराव्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून बॉलिवूडची बार्बी डॉल कतरिना कैफ आऊट झाली आहे. तिच्या जागेवर कतरिना दीपिका पदुकोणची वर्णी लागली आहे. कतरिना कैफ ज्या इंटरनॅशनल कॉस्मेटिक ब्रॅंडला गेल्या ३ वर्षांपासून इंड्रॉस करत होती त्या ब्रॅंडने कतरिनाच्या जागी दीपिकाला रिप्लेस केलं आहे.


दीपिकाची स्टायलिस्ट शालिनी नथानीने इंन्स्टग्रामवर एक फोटो शेअर करत दीपिकाच्या नव्या ब्रॅण्ड असोसिएशनची तिच्या फॅन्सना माहिती दिली आहे.आता मे महिन्यात रंगणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या आणि सोनम बरोबर रेड कार्पेटवर दीपिका पदूकोन आपला जलवा दाखवणार आहे.