मुंबई : जॉन अब्राहम, वरुण धवन आणि जॅकलीन फर्नांडिजचा आगमी सिनेमा 'ढिशूम' हा कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. सिनेमामध्ये  जॅकलीनही कंबरेवर खंजीर लावलं आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील शीख गुरुद्वारा कमेटीने यामुळे शिखांच्या भावना दुखवल्याचा आरोप करत निर्मात्यांना नोटीस पाठवली होती. आता चंदिगडमधील एका नागरिकांने याविरोधात दिग्दर्शक रोहित धवन, निर्माता साजिद नाडियाडवाल आणि जॅकलीन फर्नांडिज विरोधात तक्रार नोंदवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार कोर्टाने तक्रारदाराला प्रथम प्रत्यक्षदर्शीला कोर्टासमोर आणण्यास सांगितलं आहे. याप्रकरणाची पुढील चौकशी १ जुलैला होणार आहे. ढिशूम सिनेमा २९ जुलैला रिलीज होणार आहे. १५ जूनला डीएसजीएमसीने नोटीस पाठवून सिनेमातील या गाण्याचा व्हिडिओ काढण्यास सांगितला होता. किंवा हे खंजीर न लावता गाणं शूट करण्यास सांगितलं आहे. शीख संस्थेने सिनेनिर्मात्यांना ७ दिवसात माफी मागण्यास सांगितलं आहे.


अभिनेता वरुण धवनने म्हटलं होतं की, या गाण्यात खंजीरचा वापर नाही केला गेला आहे. ही एक अरबी तलवार आहे. वरुणने म्हटलं की, 'मी स्वत: पंजाबी आहे. निर्माते ही पंजाबी आहेत. त्यामुळे आम्ही असं काहीही करण्याचा विचार देखील करु शकत नाही. विवाद हा फक्त एका गैरसमजमुळे झाला आहे.'