मु्ंबई : करिना कपूर, शाहिद कपूर, आलिया भट्ट आणि दिलजीत दोसांझ ही स्टारकास्ट असलेल्या उडता पंजाबचे सेंसर बोर्डने पंखच छाटले आहेत. १ नाही २ नाही तर तब्बल ४० सिन्स कट करूनच हा चित्रपट रिलीज करा असे सेन्सॉर बोर्डने सांगितले आहे. ड्रग्स, अश्लिल भाषा, अपशब्दांचा उल्लेख असल्यामुळे हा चित्रपट सेन्सॉर बोर्डच्या कचाट्यात सापडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकीय हस्तक्षेप


या चित्रपटामध्ये पंजाबचे जे चित्र दाखवण्यात आले त्याने राज्याची प्रतिमा बिघडेल. राज्याची नकारात्मक प्रतिमा दाखवल्यामुळे त्याचा फटका पुढील वर्षी असणाऱ्या निवडणुकीत दिसून येईल, म्हणून शिरोमणी अकाली दल या पंजाबमधल्या राजकीय पक्षाने सेन्सॉर बोर्डला हा चित्रपट बॅन करण्यास सांगितले.
 
त्यामुळेच 'उडता पंजाब' हे शीर्षक बदला त्याऐवजी उडता ठेवा नाहीतर काहीही ठेवा पण राज्याचा उल्लेख नको अशी ही अट सेन्सॉर बोर्डानं ठेवली आहे. तर दुसरीकडे राम गोपाल वर्माने या फिल्मचे नाव उडता पंजाब न ठेवता 'उडता इंडिया' किंवा 'उडता वर्ल्ड' असे ठेवण्यास सांगितले आहे. राम गोपाल वर्माच्या मते ज्या ड्रग्स च्या गोष्टी उडता पंजाबमध्ये दाखवल्यात त्या खर पाहता संपूर्ण भारतात आणि जगात होतात.

उडता पंजाब ही ड्रग्स आणि त्याचे आजच्या तरूण पिढीतले अॅडिक्शन आणि त्याचे होणारे वाईट परिणाम या विषयावर आधारित आहे.