बेळगाव : 'सैराट' चित्रपटाचा फिव्हर प्रेक्षकांवर इतका चढलाय की आता चक्क एका बाळाचं नावच 'सैराट' ठेवण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही म्हणाल, गंमत करताय का? नाही... ही गंमत नसून खरंच एका जोडप्यानं आपल्या चिमुकल्याला 'सैराट' हे नाव दिलंय.  


बेळगावातल्या गांधीनगर भागात हे जोडपं राहतं. नुकतीच त्यांना पुत्रप्राप्ती झालीय. दीपाली मंडोळकर आणि मनोहर मंडोळकर अशी या पती पत्नीची नावं आहेत. 


'सैराट' म्हणजे वेगवान, सुस्साट... इंटरनेटवरही या शब्दाचा असाच काहीसा अर्थ देण्यात आला होता. हा चित्रपट आपल्याला भावला... तसंच आपल्या बाळालाही थोडं लवकरच दात आलेत... त्यामुळे आपण त्याला 'सैराट' असं नाव द्यायचं ठरवलं, असं मंडोळकर दाम्पत्यानं म्हटलंय.