मुंबई : मेगास्टार चिरंजीवीचा कमबॅक तेलगू सिनेमा 'खिलाडी नंबर 150'नं बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमानं केवळ पाच दिवसांत जगभरात 100 करोड रुपयांचा बिझनेस केलंय. 10 जानेवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित झालाय. 


सुरुवातीपासूनच या सिनेमानं बक्कळ पैसावसुली केलीय. पहिल्याच दिवशी या सिनेमानं जगभरात 47 करोड रुपयांची कमाई केली... आणि आमिर खानच्या 'दंगल' या सिनेमाचा पहिल्या दिवशीचा रेकॉर्ड तोडला. 


'खिलाडी नंबर 150'

'कबाली' आणि 'बाहुबली'नंतर 'खिलाडी नंबर 150' तिसऱ्या क्रमांकावरची सर्वात मोठी ओपनिंग असलेला सिनेमा ठरलाय.


सिनेटीकाकार तरण आदर्शनं ट्विट करत तेलगु सिनेमे यूएस मार्केटमध्ये धम्माल उडवून देत असल्याचं म्हटलंय. 



या सिनेमाचं दिग्दर्शन व्ही व्ही विनायक यांनी केलीय. तर या सिनेमात काजल अग्रवाल आणि तरुण अरोड यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा तमिळ सिनेमाचा ऑफिशिअल रिमेक आहे. सिनेमात चिरंजिवी डबल रोलमध्ये दिसतो.