मुंबई : एका अभिनेत्रीने दुसऱ्या अभिनेत्रीचं कौतुक केलं तर तिसऱ्या अभिनेत्रीला ते खटकतं... असंच काहीसं सध्या घडतंय ते प्रियांका-कतरिना आणि दीपिकामध्ये... प्रियांकाने केलेली कतरिनाची तारिफ दीपिकाला आवडलेली दिसत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण... बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या या टॉपच्या दोन हिरोईन्स... या दोघीही आता हॉलिवूड इंडस्ट्रीतही झपाट्याने आपला जलवा दाखवू लागल्यात. यात सध्या तरी देसी गर्ल प्रियंका चोप्रा आघाडीवर दिसतेय. न्यूयॉर्कमध्ये नुकत्याच झालेल्या एका पार्टीत रेड कार्पेटवर या दोघींनीही हजेरी लावली. मात्र, भाव खावून गेली ती फॅशन क्वीन प्रियांका चोप्रा...


क्रिम कलरच्या लांबसडक गाऊनमध्ये प्रियांकाने रेड कार्पेटवर एन्ट्री केली आणि हॉलिवूड इंडस्ट्रीतल्या तिच्या फॅन्सना तिनं लक्ष वेधून घ्यायला भाग पाडलं. प्रियांकाची ही रेड कार्पेटवरची एन्ट्री चांगलीच लक्षवेधी ठरली. तर दुसरीकडे दीपिकानेही याच रेड कार्पेटवर हजेरी लावली. मात्र, फॅन्सची पसंतीची पावती मिळवण्यात पुन्हा एकदा बाजी मारली ती देसी गर्लनंच.. 


प्रियांका आणि दीपिकामध्ये सध्या कॅट फाईट सुरू आहे. त्यामुळे एकमेकींना टोकण्याची एकही संधी त्या सोडत नाहीत. दीपिका आणि कतरिनामध्ये सध्या अबोला आहे. मात्र याचवेळी दुसरीकडे प्रियांकाने आपल्या आगामी 'बेवॉच' या फिल्मच्या प्रोमोमध्ये कतरिनाचा उल्लेख केलाय. एवढंच नाही तर कतरिना ही बॉलिवूड इंडस्ट्रीतली आपली सर्वात आवडती आयकॉन असल्याचंही प्रियांका म्हणतेय. या ट्रेलरमध्ये तिचा खास सहभाग आहे आणि तिने याबाबत आनंदाने यासाठी आपला होकार दिल्याचंही प्रियांकाने म्हटलंय. 


ट्रेलरमधील कतरिनाच्या डायलॉगमुळेच भारतात या फिल्मचं अधिक जोमाने प्रमोशन होण्यासाठी फायदा होईल, असा विश्वासही या देसी गर्लनं व्यक्त केलाय. एकूणच प्रियांका आणि कतरिना यांच्यात अधिक घट्ट मैत्री होऊ लागल्याचंच, हे लक्षण म्हणावं लागेल. आता बॉलिवूडमध्ये एवढ्या सगळ्या तारका असताना 'बेवॉच'च्या ट्रेलरसाठी प्रियांकाची पसंती कतरिनालाच का? असा सवाल तुम्ही करू शकता. 


कदाचित दीपिकाला जेलसी निर्माण करण्यासाठीच तर प्रियांकाचा हा सगळा खटाटोप नसेल ना, याचीही आता चर्चा रंगू लागलीय.