मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माला मुंबई हाईकोर्टातून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. कपिल शर्माने बीएमसीविरोधात मुंबई हाइकोर्टात याचिका दाखल केली होती. कपिल शर्माने केलेलं बांधकाम तोडू नये म्हणून त्याने याचिका दाखल केली होती. या बांधकामावर कारवाई होण्यापासून २३ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
 
कपिल शर्माच्या ऑफीसच्या बांधकामावर कारवाई होऊ नये म्हणून त्याने हाइकोर्टात बीएमसी विरोधात याचिका दाखल केली होती. कपिल शर्माचा आरोप आहे की, बीएमसी चुकीच्या पद्धतीने काम करत आहे. त्यांचं हे पाऊल बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिल शर्माने मागील महिन्यात ट्विट करत बीएमसीच्या अधिकाऱ्याने ५ लाख रुपये मागितल्याचा दावा केला होता. त्यानंतर मुंबईत सुरु असलेलं त्याच्या ऑफिसचं बांधकामावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.


कपिल शर्माने मुंबई हाइकोर्टात याचिका दाखल करत लिहिलं आहे की, १८ माळ्याच्या या इमारतीला सीसी आणि ६ नोव्हेंबर २०१३ ला ओसी देखील बीएमसीनेच दिली होती. पण अचानक १४ नोव्हेंबर २०१४ ला बीएमसीने ही इमारत अनधिकृत ठरवली.