कॉमेडी नाईट् बचावचा लवकरच प्रेक्षकांना बाय बाय
कलर्स चॅनेलवरील कॉमेडी नाइट्स बचाव हा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या शोच्या निर्माती अनिता हसानंदनी यांनी याचा खुलासा केलाय.
मुंबई: कलर्स चॅनेलवरील कॉमेडी नाइट्स बचाव हा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या शोच्या निर्माती अनिता हसानंदनी यांनी याचा खुलासा केलाय.
या शोच्या सर्व कलाकारांनी सोशल साइट्स वर पोस्ट टाकून चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद मानले. 2016मध्ये हा शो सुरु झाला होता. मात्र या शोला प्रेक्षकांचा तितकासा प्रतिसाद लाभला नाही.
दरम्यान, हा शो आता जरी प्रेक्षकांना अलविदा करणार असला तरी लवकरच याचा दुसरा भाग पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याची माहिती आहे.