मुंबई : साधारण १५ वर्षापूर्वी 'शक्तिमान' मालिकेने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच वेड लावले होते. शक्तिमान म्हटलं की, त्याचे ते एक बोट वर करुन गोल फिरणे, वाईट गोष्टींचा नाश करणे, मुलांना चांगल्या गोष्टी सांगणे आणि दुर्जनांशी ढिशूम-ढिशूम करणे या सर्व गोष्टी आजही सगळ्यांच्या लक्षात असतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दूरदर्शनवरची ही मालिका संपल्यानंतर परत कोणती अशी मालिका आली नाही, पण आता लवकरच छोट्या पडद्यावर शक्तिमान पुन्हा दिसणार आहे. सूत्रानुसार अस समजतय की, आगामी 'शक्तिमान' मालिका आधीपेक्षा वेगळी नसेल. तर फक्त तंत्रज्ञानाचा वापर करुन आधिक देखणी करण्यात येणार आहे. शिवाय कथाही पुढे सरकणार आहे.


तसेच 'शक्तिमान'नंतर काहींनी तशा मालिका आणण्याचा बराच प्रयत्न केला पण तो फार यशस्वी झाला नाही. आता तुम्हाला उत्सुकता लागली असेल की, शक्तिमानची भूमिका कोण करणार आहे. तर तुमचे आवडते 'मुकेश खन्ना'च ही भूमिका साकारणार आहेत. या भूमिकेसाठी त्यांना १५ किलो वजन कमी करायला लागणार आहे. त्यापैकी ८ किलो वजन कमी केले तर उर्वरित वजन कमी करण्यासाठी ते व्यायाम करत आहे.