कतारमध्येही झिंगाट डान्स
केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारत आणि भारताबाहेरही नागराज मंजुळे दिग्दर्शित `सैराट`ची चर्चा सुरु आहे. सैराटच्या सर्वच गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावलंय. राज्यातील प्रत्येक थिएटरमध्ये सैराटमधील झिंगाट या गाण्यावर प्रेक्षक ठेका धरतायत.व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.
मुंबई : केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारत आणि भारताबाहेरही नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट'ची चर्चा सुरु आहे. सैराटच्या सर्वच गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावलंय. राज्यातील प्रत्येक थिएटरमध्ये सैराटमधील झिंगाट या गाण्यावर प्रेक्षक ठेका धरतायत.व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.
इतकंच नव्हे तर कतारच्या दोहा येथीलही थिएटरमध्ये झिंगाट या गाण्यावर प्रेक्षकांनी झिंगाट डान्स केला. त्याचा व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आलाय.
अजय-अतुल यांनी संगीतबद्ध तसेच त्यांनी गायलेल्या या गाण्याला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. संपूर्ण चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी गर्दी लाभतेय.