`डार्लिंग डोन्ट चीट`च्या वादग्रस्त ट्रेलरवरुन वाद

`डार्लिंग डोन्ट चीट` या आगामी चित्रपटाच्या विरोधात उत्तर प्रदेशमध्ये निदर्शने सुरु आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर चांगलाच वादग्रस्त झालाय.
नवी दिल्ली : 'डार्लिंग डोन्ट चीट' या आगामी चित्रपटाच्या विरोधात उत्तर प्रदेशमध्ये निदर्शने सुरु आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर चांगलाच वादग्रस्त झालाय.
मेरठमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयमोर आंदोलकांनी या चित्रपटाचे पोस्टर्स जाळले. या आंदोलकांमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. या चित्रपटावर बंदी घालण्याबाबत आंदोलनकर्त्यांनी पत्रही लिहिलेय.
राजकुमार हिंदुस्थानी यांनी दिग्दर्शित या चित्रपटात राम गौरव पांडेय, आशिष त्यागी आणि नेहा चॅटर्जी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ११ मार्चला हा चित्रपट रिलीज होतोय.