मुंबई : आमिर खानच्या 'तारे जमीं पर'फेम चिमुरडा दर्शिल सफारी तुम्हाला अजूनही आठवत असेल... हाच दर्शिल आता 'क्विकी' या सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर येतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दशकभरापूर्वी एका खट्याळ - खोडकर मुलाच्या भूमिकेत दर्शिलनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 'डायस्लेक्सिया' या आजारावरही या सिनेमातून भाष्य करण्यात आलं होतं. 


या सिनेमात दिसलेला वाकड्या-तिकड्या दातांच्या दर्शिलनं 'इशान'ची भूमिका चोखपणे पार पाडली होती. आता मात्र, दर्शिल मोठा झालाय. तब्बल दहा वर्षानंतर आता दर्शिल कसा दिसतो? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना... तर तरण आदर्श यांनी ट्विटरवर टाकलेला हा फोटो पाहा... 



दर्शिलच्या आगामी 'क्विकी' या सिनेमात वयात येणाऱ्या मुलांची प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे.