मुंबई : बहुचर्चित बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच हॉलिवूडच्या पडद्यावरही झळकणारे. बॉलिवूडमध्येही तिचा फॅन क्लब दिवसेंदिवस वाढत चाललाय.
पीकू, बाजीराव मस्तानीसारखे हिट चित्रपट देणारी दीपिका हॉलिवूडमधील हिट फिल्म XXX च्या पुढच्या भागात झळकणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चाहत्यांकडून मिळणारा उत्कृष्ट प्रतिसाद आणि एकामागोमाग मिळत जाणाऱ्या फिल्म्सच्या ऑफर्सने दीपिकाने तिच्या फिजदेखील वाढ केली आहे. दीपिका ही सध्या बॉलिवूडमधील सर्वात महाग अभिनेत्री ठरली आहे.


दीपिका घेते तब्बल...
 
एका रिपोर्टनुसार हे समोर आलेय की दिपिकाने ३-४ दिवसांच्या शूटिंगकरिता तब्बल ८ कोटी रूपये घेतले आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही रक्कम तिने कुठल्या फिल्मकरिता नाही तर चक्क एका एयरलाइन्सच्या एंडोर्समेंटकरिता घेतली आहे. एवढी रक्कम इंडस्ट्रीमध्ये तर आत्तापर्यंत फक्त शाहरूख, सलमान आणि आमीर यांनीच घेतली होती. 


एका एयरलाइन्स कंपनीने जेव्हा दीपिकाला जाहिरातीसाठी विचारले तेव्हा दीपिकाच्या टीमने एयरलाइन्स कंपनीकडे ८ कोटींची मागणी केली. सूत्रांच्या माहितीनुसार कंपनी दीपिकाला ही रक्कम द्यायला तयार झालीये. त्यामुळेच दीपिका ही बॉलिवूडमधील सर्वात महाग अभिनेत्री ठरली आहे.