रणवीर आणि दीपिकाचा गुपचूप साखरपुडा
बॉलिवूडची सगळ्यात चर्चित जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणने अजूनही त्यांच्यातील संबंधांना सार्वजनिकपणे स्विकार नाही केलं आहे. पण दोघांनी अनेकदा त्यांच्यातील असलेलं प्रेम हे जगासमोर अप्रत्यक्षपणे आणलं आहे.
मुंबई : बॉलिवूडची सगळ्यात चर्चित जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणने अजूनही त्यांच्यातील संबंधांना सार्वजनिकपणे स्विकार नाही केलं आहे. पण दोघांनी अनेकदा त्यांच्यातील असलेलं प्रेम हे जगासमोर अप्रत्यक्षपणे आणलं आहे.
रणबीर आणि दीपिका यांनी गुपचुपपणे साखरपुडा केल्याची आता बातमी आहे. मुंबई मिरर या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार या वर्षाच्या सुरुवातीला दीपिका आणि रणवीरचे आई-वडील एकमेकांना भेटले होते.
दोघांनीही नातेवाईकांच्या साक्षीने साखरपुडा केल्याची बातमी आहे. दोघांच्या कुटुंबियांनी रणवीर आणि दीपिकाचा साखरपुडा केला आहे. पण दीपिका आणि रणवीरचा लग्नाचा अजून काहीही विचार नाही आहे. त्यांना त्यांच्या करिअरवर अधिक लक्ष द्यायचं आहे.
संजय लीला भंसाली यांच्या रामलीला सिनेमामधून दीपिका आणि रणवीर यांच्यातली जवळीकता वाढली होती. सध्या दीपिका हॉलिवूडमध्ये काम करतेय. लवकरच दीपिकाचा ट्रिपल एक्स सीरीज हा सिनेमा येणार आहे ज्यामध्ये ती विन डीजलसोबत लीड रोलमध्ये दिसणार आहे.