मुंबई : केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर याचा परिणाम सगळीकडेच पाहायला मिळतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एटीएम तसेच बँकाबाहेरच्या रांगा काही कमी होत नाहीयेत. टीव्ही अभिनेता शक्ती अरोरा आणि नेहा सक्सेना यांनाही नोटाबंदीचा चांगलाच फटका बसला. नोटाबंदीमुळे त्यांना आपले लग्न चक्क पुढे ढकलावे लागले. त्यांचे लग्न 15 नोव्हेंबरला होणार होते.


याबाबत बोलताना अभिनेता शक्ती म्हणाला, 'लग्नासाठी केटरर्स तसेच इतरांना मी अॅडव्हान्स दिला होता. मात्र त्यांनी आता ते पैसे घेण्यास नकार देतायत. इतके सगळे पैसे बदलून आणण्यासाठी मला खूप दिवस लागतील. त्यामुळे लग्न किती दिवस पुढे ढकलले जाईल हे सांगता येत नाही. यावर्षी लग्न होणार नाही हे मात्र नक्की आहे.'