मुंबई : भारतीय वनडे आणि टी 20 टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट लवकरच रिलीज होत आहे. सुशांतसिंग राजपूत या चित्रपटामध्ये धोनीची भूमिका करत आहे. खुद्द महेंद्रसिंग धोनीही या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटाच्या राईट्ससाठी धोनीला तब्बल 80 कोटी रुपये मिळाले आहेत. यातले 20 कोटी रुपये धोनीला आधीच देण्यात आल्याचंही बोललं जात आहे. बॉलीवूडमध्ये प्रमुख भूमिका करणाऱ्या अभिनेता-अभिनेत्रींनाही एवढी रक्कम मिळत नाही. जेवढे पैसे धोनीला देण्यात आले आहेत, तेवढी कमाई बहुतेक चित्रपटही करत नाहीत. 


धोनीच्या या बायोपिकचा टिझर आत्तापर्यंत 17 मिलियन लोकांनी यूट्यूबवर बघितला आहे. तर फेसबूकवरही हा चित्रपट ट्रेन्डिगमध्ये आहे. 30 सप्टेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.