मुंबई : दिलीप प्रभावळकर यांच्यासमोर त्यांचीच मिमिक्री सादर करण्यात आली, अर्थात हे चला हवा येऊ द्यामध्येच होवू शकतं. डॉ.नीलेश साबळे यांनी अप्रतिम दिलीप प्रभावळकर सादर केले. यावर दिलीप प्रभावळकरही खळखळून हसले, नेहमी कोणत्या न कोणत्या भूमिकेत आपण दिलीप प्रभावळकरांना पाहत असतो. मात्र आज त्यांचीच मिमिक्री त्यांनी पाहिल्यानंतर, त्यांना झालेला आनंद आणि चला हवा येऊ द्यामध्ये रमलेले दिलीप प्रभावळकर पाहायला मिळाले.