कलर्स मराठी दिवाळी खास, २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर


मुंबई : महाराष्ट्रात नाही तर सर्वत्र आल्हाददायक आणि जल्लोषाचे आनंदाचे वातावरण असते ते म्हणजे दिवाळीमध्ये. सगळ्यांच्या आवडीचा आणि जवळचा सण म्हणजे दिवाळी. ज्यामध्ये असते रोषणाई, कंदील, पणत्या, फटाके, वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ आणी गिफ्ट्स. अश्याच प्रकारे कलर्स मराठीवरील यावर्षीदेखील दिवाळी रंगणार आहे. गणपती बाप्पा मोरया, सरस्वती, अस्स सासर सुरेख बाई या कार्यक्रमांमध्ये दिवाळी दणक्यात साजरी केली गेली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणपती बाप्पा मोरयामध्ये दिवाळी जोरात साजरी एकेली गेली. महादेव आणि गणेशाला पार्वतीने उटणे लावले. गणेशाला अभ्यंगस्नान घालण्यात आले. पाडव्याची दिवशी पार्वती महादेवांना औक्षण करते. त्यांची प्रिय खीर देखील भरवते. विशेच म्हणजे महादेव पार्वतीला भेट म्हणून मंगळसूत्र भेट देतात.


 


ज्या मंगळसूत्र हे खास आहे, ज्यामध्ये डमरू आणि त्रिशूल ह्याचा उपयोग केला गेला आहे, जे पार्वतीसाठी अतिशय प्रिय अशी भेट आहे. तसेच गणपती बाप्पा मोरयामध्ये भाउबीज देखील साजरी केली गेली आहे. या भाऊबीज विशेष मध्ये गणेश कार्तिकेयची भेट घेतो आणि कार्तिकेयला शिवालयात घेऊन येतो. आणि त्यामुळे पार्वतीला खूप आनंद होतो. मनसा अजूनही आपल्या कक्षात कोंडून बसलेली आहे. गणेश तिच्या मनातील खंत दूर करतो. मनसा गणेश आणि कार्तिकेयला ओवाळते कार्तिकेय मनसाचा बहिण म्हणून स्वीकार करतो. गणेश मनसाला हिरव्या रंगाचा नागम्हणी भेट म्हणून देतो.


अस्स सासर सुरेख बाईचे दिवाळीनिमित्ताने ४०० भाग पूर्ण देखील झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण सेटवर आणि कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अस्स सासर सुरेखमध्ये दिवाळीच्या निमित्ताने महाजनांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. जुईला नुकतेच अवार्डदेखील मिळाले आहे. जुई आणि यशच्या संसारात दिवाळीच्या निमित्ताने सुखाची चाहूल लागली आहे. जुईची म्हणजेच मृणालची हि मालिकेमधील आणि खऱ्या आयुष्यातील लग्नानंतची पहिलीच दिवाळी आहे. मालिकेमध्ये नवरा म्हणजेच यश बरोबर आहे पण खऱ्या आयुष्यातील नवरा मात्र दूर असल्या कारणाने हि दिवाळी मृणाल कशी साजरे करणार आहे हे विशेच आहे.


सरस्वती मालिकेमध्ये सरू म्हणजेच सरस्वती आणि राघव यांनी देखील साजरी केली. सरस्वतीने छान अशी रांगोळी काढली, दारात कंदीलदेखील लावला आहे. नुकतीच सारा नामक मुलीची एन्ट्री झाली असून आता दिवाळीमध्ये राघव नक्की पाडव्याची भेट कोणाला देणार ? काय असेल ती पाडव्याची भेट ? सरस्वती कि सारा कोणासाठी आणली आहे राघवने पाडव्याची भेट ? सरस्वतीचा देखील हा पहिला पाडवा असणार आहे, त्यामुळे हे बघणे नक्कीच रंजक असणार आहे असे म्हणायला हरकत नाहि.


तेंव्हा बघायला विसरू नका कलर्स मराठी दिवाळी खास तुमच्या आवडत्या मालिकांमध्ये.