पाकिस्तानात दिग्दर्शक कबीर खानशी असभ्य वर्तन, उगारला बूट
बजरंगी भाईजानचे दिग्दर्शक कबीर खानसोबत पाकिस्तानच्या एअरपोर्टमध्ये असभ्य वर्तन करण्यात आले.
नवी दिल्ली : बजरंगी भाईजानचे दिग्दर्शक कबीर खानसोबत पाकिस्तानच्या एअरपोर्टमध्ये असभ्य वर्तन करण्यात आले.
मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार कराची एअरपोर्टवर काही लोकांनी त्याला बूट दाखवविला.
कुठे घडला प्रकार
कबीर खान एका सेमिनारसाठी कराचीच्या जिन्ना इंटरनॅशनल एअरपोर्ट पोहचला होता.
कबीर खान आपल्या कारमधून उतरल्यावर काही पाकिस्तानी नागरिकांनी त्याला घेरले. त्याला विचारू लागले की पाकिस्तानच्या विरोधात चित्रपट का काढतो. एअरपोर्टवरील लोकांनी शेम शेमच्या घोषणा दिल्या.
यावेळी कबीर खान सर्वांसमोरून गुपचूप निघून गेले.
मधूर भांडारकर काय म्हणाले..
दरम्यान दिग्दर्शक मधूर भांडारकर याने कबीर खानशी झालेल्या असभ्य वर्तनाबद्दल निंदा केली आहे. चित्रपटात फिक्शन असते, पाकिस्तानी नागरिकांनी त्याला वाईट पद्धतीने घेतले नाही पाहिजे.
कबीर खानने सैफ अली खान आणि कतरिना कैफला घेऊन फँटम चित्रपट बनविला होता. त्यावरून लोकांनी कबीर बेदी विरोधात असभ्य वर्तन केले.