मुंबई : अख्या महाराष्ट्राला ज्यानं वेड लावलंय तो सैराट सिनेमा अजूनही अनेक ठिकाणी हाऊसफूल आहे. प्रेक्षकांनी या सैराट सिनेमाला अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. सैराटमधली गाणी तर याड लावून गेलीत. या तर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आहेत पण ज्यांनी हा सिनेमा बनवला ते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आईला सिनेमाबाबत काय वाटलं हे जाणून घ्यायला तुम्हाला नक्की आवडेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सैराटच्या प्रिमिअर शोच्या वेळी मान्यवर व्यक्तींसोबतच नागराज मंजुळेची आई देखील उपस्थित होती. सिनेमा संपल्यानंतर नागराज मंजुळे यांनी आईला सिनेमा कसा वाटला? असा प्रश्न विचारला. यावर त्यांच्या आईने म्हटलं की, 'चांगला वाटला.'


सैराट सिनेमाने एका आठवड्यात रेकॉर्डब्रेक २५ कोटींची कमाई केली. दुसऱ्या आठवड्यातही हाऊसफुल्लचा बोर्ड अजूनही कायम आहे. मराठी सिनेमा बघण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहाकडे वळत नाही मात्र ही गोष्ट या सिनेमाने मोडून काढली आहे आणि तूफान प्रतिसाद या सिनेमाला दिला.