मुंबई : सैराट चित्रपटातील केवळ परश्या आणि आर्चीच्याच भूमिकेने केवळ प्रेक्षकांची मन जिंकली नाहीत. तर त्यातील प्रत्येकाच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यातील एक म्हणजे आर्चीची मैत्रिणी अनी अर्थात अनुजा मुळये. आपल्या छोटेखानी भूमिकेतून तिने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलेय. 


पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजच्या अनुजाची या चित्रपटासाठी निवड 'लोकसत्ता लोकांकिका' या स्पर्धेद्वारे झाली होती. यावेळी नागराज यांनी तिचे काम पाहिले तिला ऑडिशनसाठी बोलावून घेतले. त्यानंतर तिची चित्रपटासाठी निवड करण्यात आली. तिने सदाशिव पेठेत नूतन कॉलेजमधून शिक्षण घेतलंय.