मुंबई : सलमान खान आणि ऐश्वर्या राय हे दोघं पुन्हा एकदा एकाच चित्रपटामध्ये काम करतील का, हा प्रश्न या दोघांच्या फॅन्सना अनेक वेळा पडला असेल. या प्रश्नावर आता खुद्द ऐश्वर्या रायनंच उत्तर दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटाची स्क्रीप्ट आणि दिग्दर्शक सर्वोत्तम असेल तरच मी सलमानबरोबर चित्रपट करीन अशी प्रतिक्रिया ऐश्वर्यानं एका मासिकाला दिली आहे. ऐश्वर्यानं ही प्रतिक्रिया दिली असली तरी सलमानला मात्र ऐश्वर्यासोबत पुन्हा काम करण्याची इच्छा नसल्याचं बोललं जात आहे. याआधी सलमान आणि ऐश्वर्यानं हम दिल दे चुके सनम आणि ढाई अक्षर प्रेम के या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं.


ऐश्वर्याचा ए दिल है मुश्किल हा चित्रपट 28 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ऐश्वर्या सलमानच्या बिग बॉसमध्ये जाणार का याबाबत मात्र अजूनही प्रश्नचिन्ह आहे.