मुंबई :  'सिरीअल किसर' इमरान हाशमी जेव्हा ऑन स्क्रिन किसिंग सीन करतो, तेव्हा त्याची पत्नी खूप चिडते. मग त्याच्या पत्नीला खूश करण्यासाठी इमरान प्रत्येक चित्रपटानंतर एक बॅग गिफ्ट करतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


इमरानने आपल्या जीवनावरील 'द किस ऑफ लाइफ' पुस्तकाचे प्रकाशन वेळी ही माहिती दिली. चित्रपटातील किसिंग सिन बद्दल त्यांच्या पत्नीची प्रतिक्रिया विचारली असता इमरान म्हणाला, तिला संताप येतो, पण ती आला मला इतक्या जोरात मारत नाही, पहिल्यांदा ती मला बॅगने मारायची. आता ती हाताने मारते. आता इतक्या वर्षात ती जरा शांत झाली आहे. 


आपल्या पत्नीचा राग शांत करण्यासाठी तिला किंमती दागिना देतो का या प्रश्नावर इमरान म्हणाला, प्रत्येक चित्रपट आणि प्रत्येक चुंबनासाठी एक बॅग मला खरेदी करावी लागते. तीचे एक कपाट बॅगने भरले आहे. 


नुकताच इमरानने अझहर चित्रपट केला त्यात नर्गिस फाखरीसोबत अनेक किसिंग सिन आहे. त्याबद्दल पत्नीला अनेक बॅग द्यावे लागले असतील असे विचारले असता तो म्हणाला. किस कितीही असतील पण बॅग एकच असते. हे आमच्यात ठरलं आहे.