नवी दिल्ली - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. माझ्या मृत्यूनंतर संपत्तीमध्ये मुलगी श्वेता आणि मुलगा अभिषेक यांचा समान हक्क असेल असं त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.


अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला. त्यामध्ये हातात एक फलक घेऊन त्यांनी त्या फलकावर लिहिलं आहे की, माझा जेव्हा मृत्यू होईल, त्यानंतर माझ्या सर्व संपत्तीवर माझा मुलगा आणि मुलीचा समान हक्क असेल. अमिताभ यांनी सोबत #genderequality #WeAreEqual असंही शेअर केलं आहे.