मुंबई : अभिनेत्री राधिका आपटे हिचा एक व्हिडिओ लिक झाल्यानंतर चर्चेत आलेला सिनेमा 'पार्च्ड' लवकरच भारतीय प्रेक्षकांसमोर येतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय.  अजय देवगन निर्मित या सिनेमात रानी, लज्जो, जानकी आणि बिजली या भूमिकांत अनुक्रमे तनिष्ठा चॅटर्जी, राधिका आपटे, लेहर खान आणि सुरविन चावला या जीव ओतून काम करताना दिसत आहेत. 


राधिकामुळे हा सिनेमा जरी चर्चेत आला असला तरी ट्रेलरमध्ये सुरविननंही प्रेक्षकांची मनं जिंकलीत.


गुजरातमधल्या उजहास या गावात या सिनेमाचं चित्रीकरण करण्यात आलंय. २३ सप्टेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.