अभिनेता ओमपुरी यांच्या विरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल
भारतीय लष्कराविरोधात वापलेल्या अपशब्दाबाबत बॉलिवूड अभिनेता ओमपुरी यांच्या विरोधात अंधेरी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
मुंबई : भारतीय लष्कराविरोधात वापलेल्या अपशब्दाबाबत बॉलिवूड अभिनेता ओमपुरी यांच्या विरोधात अंधेरी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
ओमपुरी यांनी म्हटलं होतं की, 'देशात 15 से 20 लोकं असे आहेत ज्यांना बॉम्ब बांधून पाकिस्तानात पाठवू शकतो. कोण या लोकांना लष्करात पाठवतं. त्यांना कोणी सांगितलं की लष्करात जा.'
ओमपुरी ऐवढ्यावरच नाही थांबले. तर त्यांनी हे देखील म्हटलं की, भारत-पाकिस्तानला इस्राईल आणि फिलिस्तीन नका बनवू. देशात करोडो मुस्लीम आहेत त्यांना भडकवू नका. लोकं सरकारला प्रश्न का विचारत नाही.
जेव्हा विवाद वाढू लागला तेव्हा ओमपुरी यांनी माफी मागितली. त्यांनी म्हटलं की, त्यांनी केलेल्या चुकीसाठी ते शिक्षा भोगायला तयार आहेत. लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा अभिमान असल्याचं त्यांनी शेवटी म्हटलं आहे.