मुंबई: सामाजिक विषय घेऊन चित्रपट बनवणाऱ्या प्रकाश झा यांचा जय गंगाजल रिलीज झाला आहे. आपला मागचा चित्रपट 'बाजीराव मस्तानी'मध्ये ऐतिहासिक भूमिका केलेली प्रियांका चोप्रा या चित्रपटात एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. तर प्रकाश झा यांनी या चित्रपटातून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2003 मध्ये आलेल्या 'गंगाजल' चित्रपटाचा हा सिक्वल असला तरी या चित्रपटाचा प्लॉट मात्र वेगळा आहे. 


काय आहे कहाणी ?


बिहारच्या बांकेपूरमध्ये बबलू पांडे(मानव कौल) याचं राज्य चालतं. बबलूचा भाऊ डबलू(निनाद कामत) हा भावाच्या नावानं दादागिरी करून लोकांवर अत्याचार करतो. एका विजेच्या प्रोजेक्टसाठी तो गावतल्या लोकांची जमिन जबरदस्तीनं हडप करतो. ज्यामुळे गावाकरी त्रस्त होतात, आणि आत्महत्या करतात.


गंगाजल प्रमाणेच या चित्रपटातली पोलीस आणि गुंडांचं साटंलोटं दाखवण्यात आलं आहे. 


प्रियांकाची एन्ट्री


त्यानंतर बांकेपूरमध्ये एसपी आभा माथूर (प्रियांका चोप्रा) ला पाठवलं जातं. आभाला कायद्याची कडक अंमलबजावणी करून बबलू पांडेकडून सुरु असलेले अत्याचार संपवायचे असतात. पण ती अपयशी ठरते, कारण सगळी पोलीस फोर्सचं बबलू पांडेची गुलामी करते. 


बीएन सिंग(प्रकाश झा) बबलू पांडेचा खास माणूस. पण आभानं रागामध्ये त्याला ऐकवल्यानंतर तो सुधारतो आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं चित्रपटाला सुरुवात होते. 


प्रियांकापेक्षा प्रकाश वरचढ


चित्रपटाचे ट्रेलर आणि प्रमोशन बघितल्यावर कोणालाही प्रियांका चोप्रा लिड रोलमध्ये असल्याचं वाटेल. पण प्रकाश झानं आपल्या कसदार अभिनयानं प्रियांका चोप्रालाही मागे टाकलं आहे. प्रकाश झाचा अभिनय बघून कोणालाही त्याचं हे अभिनय क्षेत्रातलं पदार्पण असल्यासारखं वाटणार नाही. 


चित्रपटामध्ये प्रियांका लिड रोलमध्ये असली तरी, चित्रपटामध्ये ती जास्त वेळ दिसली नाही. पण तिच्या वाट्याला जेवढा अभिनय आला आहे, तो तिनं चोख पार पाडला आहे. त्यामुळे तुम्ही प्रियांका चोप्रा आणि प्रकाश झा च्या चित्रपटाचे फॅन असाल तर निदान एकदा तरी हा चित्रपट नक्की पाहू शकता.