फिल्म रिव्ह्यू : `मिर्झ्या`ची मिर्जा-साहिबान जोडी प्रेक्षकांना भावली
बिग स्क्रिनवर राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा `मिर्झ्या` हा सिनेमा प्रदर्शित झालाय. या सिनेमाची खासियत म्हणजे तब्बल १७ वर्षांनी लेखक गुलजार यांनी या सिनेमासाठी स्क्रिन प्ले लिहिलाय.
सिनेमा : मिर्झ्या
दिग्दर्शक : राकेश ओमप्रकाश मेहरा
लेखक : गुलझार
कलाकार : हर्षवर्धन कपूर, सय्यामी खेर, ओम पूरी, अनुज चौधरी, आर्ट मलिक, अंजली पाटील, के. रैना
संगीत : शंकर - एहसान - लॉय
मुंबई : बिग स्क्रिनवर राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा 'मिर्झ्या' हा सिनेमा प्रदर्शित झालाय. या सिनेमाची खासियत म्हणजे तब्बल १७ वर्षांनी लेखक गुलजार यांनी या सिनेमासाठी स्क्रिन प्ले लिहिलाय.
हर्षवर्धन कपूरची बॉलिवूड एन्ट्री
अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूरचा हा पहिलाच सिनेमा... 'मिर्झ्या' या सिनेमात त्याची साथ देतेय अभिनेत्री सयामी खेर... मिर्झा-साहिबान यांच्या प्रेमकथेवर आधारित हा सिनेमा आहे.
पंजाबच्या मातीत आजवर अनेक प्रेम कथा पहायला मिळाल्या. पंजाबचीच प्रसिद्ध प्रेम कहाणी मिर्झा साहिबान यांच्या जीवनावर आधारित 'मिर्ज्या' हा सिनेमा आहे. मात्र, या कहाणीला आणि एकूणच संपूर्ण सिनेमाला जरा नव्या आणि हटके पद्धतीनं सादर करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक राकेश ओम प्रकाश मेहरा यांनी केलाय.
सयामीचा दिलखेच अंदाज
अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर यांनं साकारलेली मोहनीश व्यक्तिरेखा चांगली झालीय. मात्र, नवोदित अभिनेत्री सयामी खेर हिनं साकारलेली सुचित्रा भाव खावून जाते. अभिनेत्री सयामी खेरमध्ये एक स्टार क्वालिटी आपसूकच तिच्या अभिनयातून जाणवते. खरंतर अभिनेता हर्षवर्धन कपूर आणि सयामी खेर या दोघांचाही हा पहिलाच सिनेमा, मात्र अभिनेत्री सयामी खेर या सिनेमासाठी पुढील अनेक दिवस प्रक्षकांच्या नक्कीच लक्षात राहिल.
सिनेमाचं संगीत अप्रतिम झालंय. विशेष करुन मिर्झा हे गाणं... या सिनेमाला आम्ही देतोय तीन स्टार