दिग्दर्शक : साजिद - फरहाद

निर्माते : साजिद नाडियादवाला

लेखक : साजिद - फरहाद

कलाकार : अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडीस, नर्गिस फाकरी, लिजा हेडन

वेळ : १४५ मिनिटे

 

मुंबई : प्रत्येक चित्रपटाची आपली एक वेगळी शैली असते. अर्थ काढायला गेलात तर 'हाऊसफुल ३' बघायला जाण्याचा विचारही करू नका... 'हाऊसफुल ३' हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झालाय.

डोकं बाजूला ठेऊन जर फिल्म बघायला गेलात तरच एन्जॉय करू शकता. व्हेकेशनचा ब्रेक घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच या सिनेमाचा आनंद घेऊ शकता. साजिद - फरहादच्या हाऊसफुलच्या सिरीजमधून तसेही हेच अपेक्षित होते. साजिद-फरहादच्या दिग्दर्शित 'हाउसफुल ३'मध्ये अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, बमन ईराणी, जॅकलीन फर्नांडिस, लिजा हेडन, नर्गिस फाकरी आणि जॅकी श्रॉफ हे कलाकार आहेत. या सगळ्यात मात्र अक्षय-रितेश-अभिषेकची जोडी चांगलीच रंगलीय.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'नसलेलं' कथानक



बमन ईरानीच्या नर्गिस, जॅकलीन आणि लिजा या तीन मुली असतात. या तिघींना अक्षय-रितेश- अभिषेक आवडतात. मात्र, ते बमनला आवडत नाहीत. या सगळ्यात जॅकी श्रॉफची एंन्ट्री आहे. पाहायला गेल तर स्टोरीमध्य काहीच नवीन नाहीय फक्त अभिनेत्यांचा ढीग आहे. कॉमेडी करण्याच्या नावाने काहीही विनोद टाकलेले आहे. फक्त जोक्स बनवण्याच्या हेतूने फिल्म बवनलीय. मात्र स्टोरी त्याला काहीच नाहीय. फिल्मचा पहिला भाग बघण्यासारखा आहे पण दुसरा भाग तितकाच कंटाळवाणा आहे.

अक्षय - रितेश - अभिषेक काय हे?



अक्षय-रितेशसारख्या अभिनेत्यांनी अशी स्क्रिप्ट का घ्यावी असाच प्रश्न पडतो. अपेक्षेप्रमाणेच अभिषेकला कॉमेडी जमलेली नाही. उरलेल्या तीन अभिनेत्री तर फक्त 'शो पीस' म्हणूनच आहेत.

फिल्ममध्ये त्यांच्या स्वत;च्या कॉमेडी डायलॉगपेक्षा व्हॉट्सअॅपचेच जोक्सचाच भडीमार आहे. या फिल्मचे प्रमोशन जोरात झाले. मात्र, आधीच्या हाउसफुलच्या भागांपेक्षा या भागात काही दम नाहीय. त्यामुळे 'हाऊसफुल ३' हा प्रेक्षकांना किती आवडणारे, ही शंकाच आहे.