फिल्म रिव्ह्यू : सचिन:अ बिलियन ड्रीम्स
सचिन: अ बिलियन ड्रीम्स हा सचिनेच्या आयुष्यावर आधारीत सिनेमा शुक्रवारी रिलीज होणार आहे. क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची ही कथा आहे. एक मध्यमवर्गीय कुटुंबातून एक मुलगा कशा प्रकारे यशाच्या शिखरावर पोहोचतो हे या सिनेमामध्ये दाखवण्यात आलं आहे.
मुंबई : सचिन: अ बिलियन ड्रीम्स हा सचिनेच्या आयुष्यावर आधारीत सिनेमा शुक्रवारी रिलीज होणार आहे. क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची ही कथा आहे. एक मध्यमवर्गीय कुटुंबातून एक मुलगा कशा प्रकारे यशाच्या शिखरावर पोहोचतो हे या सिनेमामध्ये दाखवण्यात आलं आहे.
सिनेमाची सुरुवात एक व्हिडिओपासून होते. ज्यामध्ये सचिनच्या हातात त्याची लहान मुलगी दिसते. साराचा हा रिअल व्हिडिओ आहे. जेव्हा सारा जन्माला आली होती. तेव्हा सचिन बोलतो की मला खूप भीती वाटते आहे हिला पकडायला. मग सिनेमाची कथा सचिनच्या लहानपणापासून सुरु होते. सचिन लहानपणी खूप आगाऊ होतो. तो कोणाच्याही गाडीची हवा काढून टाकायचा.
सचिनचं आयुष्य तेव्हा बदलतं जेव्हा त्याची बहिण त्याला बॅट गिफ्ट करते. या नंतर सचिन त्याचा मोठा भाऊ अजीत सोबत क्रिकेट खेळणे सुरु करतो. 1983 च्या वर्ल्डकपने सचिनच्या आयुष्याला एक वेगळी दिशा दिली. तो क्रिकेटला त्याचं सर्वकाही मानू लागला आणि वर्ल्डकप जिंकण्याची त्याची इच्छा होते.
गुरु आचरेकर यांच्यासोबत क्रिकेट प्रॅक्टिस पासून ते पहिल्या मॅचचा प्रवास एका ड्रामा फॉर्ममध्ये दाखवण्यात आला आहे. सिनेमात अधिक खरे व्हिडिओ दाखवण्यात आले आहेत. वेगवेगळ्या लोकांसोबत सिनेमाची कथा पुढे जाते.
सचिनच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा नक्कीच प्रेरणादायी देणारा आहे. सचिनचं नावच या सिनेमासाठी खूप आहे. त्यामुळे सिनेमाला कसा आहे याबाबत काहीही सांगण्याची गरज नाही.