फिल्म रिव्ह्यू : `द बीग फ्रेन्डली जायंट`
डिज्ने निर्मित ऑस्कर पुरस्कारानं सन्मानित दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्गचा `द बीग फ्रेन्डली जायंट` हा हॉलिवूडपट आज बिगस्रिनवर झळकलाय.
जयंती वाघधरे, मुंबई : डिज्ने निर्मित ऑस्कर पुरस्कारानं सन्मानित दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्गचा 'द बीग फ्रेन्डली जायंट' हा हॉलिवूडपट आज बिगस्रिनवर झळकलाय.
'द बिग फ्रेन्ड्ली जायंट' हा फॅन्टसीवर आधारित सिनेमा आहे. बच्चे कंपनीसाठी खास तयार करण्यात आलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय ऑस्कर विनिंग दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्ग यांनी...
सौफी या दहा वर्षीय मुलीची ही गोष्ट आहे. सौफी लंडनच्या एका अनाथाश्रमात राहतेय. एके दिवशी तिला तिच्यासमोर एक मोठा भव्य राक्षस दिसतो. तो राक्षस तिला त्याच्यासोबत घेऊन जातो. या जाइंटबद्दल सोफी इतरांना सांगेल या भीतीने तो तिला त्याच्यासोबतच ठेवण्याचा निर्णय घेतो. या राक्षसाचं नाव आहे 'द बिग फ्रेन्डली जाइंट'...
या 'बीग फ्रेन्डली जाइंट' अखेर सोफीचा चांगला मित्र बनतो, त्यांची मैत्री इतकी घट होते की सोफीला ही आता त्याला सोडून जावंसं वाटत नाही... त्यानंतर काय घडतं या साठी तुम्हाला सिनेमा पहावा लागेल.
या सिनेमातली 'बिग फ्रेन्डली जाइंट'ची मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेता मार्क रायलान्सनं... तर सोफी या मुली व्यक्तिरेखा साकारली आहे बालकलाकार रुबीनं... या दोघांनीही आपआपल्या व्यक्तिरेखा चोख पार पाडल्या आहेत. 'द बिग फ्रेन्ड्ली जायंट' हा सिनेमा तुम्हाला सुरुवातीपासून शेवटापर्यंत खिळवून ठेवतो. विशेष करुन बच्चे कंपनीसाठी हा सिनेमा एक ट्रीट असून, 'द बिग फ्रेन्ड्ली जायंट' हा एक कम्प्लिट फॅमिली एंटरटेनर आहे...
तेव्हा या सिनेमातले हे सगळे फॅक्टर्स पाहता आम्ही 'द बिग फ्रेन्ड्ली जायंट' या सिनेमाला देतेय साडे तीन स्टार्स...