मुंबई : गेल्या आठवड्यात जीन गुडइनफसोबत गुपचूप विवाह करणाऱ्या प्रीती झिंटाने पहिल्यांदाच आपल्या लग्नविषयी जाहीर वाच्यता केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर तिने पोस्टद्वारे आपल्या लग्नाबाबत सांगितले. या पोस्टमध्ये प्रीती म्हणते 'मी माझं 'मिस' हे ब्रीद कोणीतरी 'गुड इनफ' (चांगलं) मिळेपर्यंत बाळगून होते. पण, आता मात्र मी ते सो़डून दिलंय. मित्रांनो मी आता 'मॅरिड क्लब'ची सदस्य झालीये. तुमच्या शुभेच्छा आणि सदिच्छांसाठी आभार. आय लव्ह यू. 'गुडइनफ'चे जोक्स आता सुरू करा.'



अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे आर्थिक सल्लागार म्हणून काम करणाऱ्या तिच्या बॉयफ्रेंडसोबत प्रीतीने गेल्या आठवड्यात कुटुंबीय आणि मित्र मैत्रिणींच्या उपस्थितीत छोटेखानी विवाह केला. तिची आई तिच्या लग्नासाठी मागे लागली होती, म्हणून शेवटी वयाच्या ४२व्या वर्षी तिने लग्नाचा निर्णय घेतल्याचं प्रीतीने डेक्कन क्रॉनिकल वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं.


लवकरच ते मुंबईत राजपूत पद्धतीने प्रीती आणि जीनचा विवाह संपन्न होणार आहे. या सोहळ्यात सलमान खान, सुझान खान आणि अन्य काही मंडळीही उपस्थित राहणार आहेत.