चिपळूण : 'झी मराठी' चॅनलवर 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय. पण, याच कार्यक्रमावर चिपळूणमध्ये नुकतीच एक तक्रार दाखल करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कोकणातली भूतं लय वाईट हा... एकदा धरल्यानी ना तर सोडत नाय' असं म्हणत प्रेक्षकांसमोर दाखल झालेल्या या मालिकेत कोकणस्थ नाईक कुटुंबाची कथा प्रसारित होत आहे. 


ही मालिका अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी मालिका आहे... या मालिकेतून कोकणची बदनामी केली जात आहे, असं म्हणत चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत तक्रार दाखल करण्यात आलीय. 


असं असलं तरी, मालवणी भाषेच्या गूढ गोडव्याचा प्रत्यय देणाऱ्या या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली, हे मात्र खरं... ‘मालवणी डेझ’नंतर बऱ्याच कालावधीने झी मराठीवर कोकण आणि मालवणी भाषेवर आधारलेली एक रहस्यमय मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलीय.