दिल्ली : गायक अभिजित याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ट्विटरवरुन एका महिला पत्रकारावर अश्लील शेरेबाजी केल्याबदद्ल, अभिजित विरोधात दिल्लीमध्ये एफआयआर दाखल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तामिळनाडूमध्ये इन्फोसिस कंपनीची कर्मचारी एस स्वाती हिची हत्या झाली. ही हत्या लव जिहादचा प्रकार असल्याचं ट्विट अभिजितनं केलं होतं. त्यावर अभिजित भट्टाचार्य धार्मिक भावना दुखावत असल्याचा आरोप महिला पत्रकारानं ट्विटरवरुन केला होता. त्याला प्रत्त्युत्तर देताना अभिजितनं अश्लील भाषेत त्या महिलेला शिवीगाळ केली होती. दरम्यान आपण अशा धमक्यांना घाबरणार नसल्याची प्रतिक्रिया अभिजित यांनी दिली आहे.