नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑन, अभिनेता तुषार कपूर आणि वीर दास यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आलाय. यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निर्देशक मिलाप जावेरी यांचा सिनेमा एडल्ट कॉमेडी 'मस्तीजादे'मध्ये एक सीन दाखविण्यात आला. या सीनमुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्याचे तक्रार करताना म्हटले गेलेय.



'मस्तीजादे' या सिनेमात सनी लिऑन एका मंदिरात कंडोम प्रमोट करता दाखविण्यात आले आहे. त्यामुळे धार्मिक भावना दुखविण्याचा हा प्रयत्न आहे.