मुंबई :   गणपती पुजेच्या वेळी बेडरुममध्ये अचानक आग लागून टीव्ही अभिनेत्रीअभिनेत्री अंकिता लोखंडे जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे आगीच्या घटनेतून थोडक्यात बचावली.


बेडरुमध्ये मेणबत्तीमुळे पडद्यांनी अचानक पेट घेतला आणि संपूर्ण बेडरुममध्ये आगीने रौद्र रुप धारण केलं. 


आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये हाताला आणि गळ्याला जखम झाली, अशी माहिती अंकिताने दिली आहे.


आग लागली तेव्हा अंकिताच्या घराबाहेरच गॅस सिलेंडर ठेवलेले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आगीमुळे घराचं मोठं नुकसान झाल्याचीही माहिती आहे.