ग्रेट ग्रँड मस्तीचा फर्स्ट लूक लॉन्च
ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटाचा फर्स्ट लूक लॉन्च करण्यात आला आहे.
मुंबई : ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटाचा फर्स्ट लूक लॉन्च करण्यात आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही लवकरच लॉन्च होणार आहे. मस्ती आणि ग्रँड मस्तीमध्ये प्रेक्षकांना हसवणारे रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफातब शिवदासानी पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवायला येत आहेत. ग्रेट ग्रँड मस्तीचा फर्स्ट लूक रितेश देशमुखनं ट्विटरवर शेअर केला आहे.
२००४मध्ये मस्ती हा ऍडल्ट चित्रपट रिलीज झाला होता. बॉलीवूडमधला मस्ती हा पहिला ऍडल्ट कॉमेडी चित्रपट होता. रितेश, विवेक आणि आफताब या तिघांना विवाहबाह्य संबंध प्रस्थापित करणाची इच्छा आणि त्यातून होणाऱ्या गोंधळावर हा चित्रपट होता.
मस्तीच्या यशानंतर नऊ वर्षांनी ग्रँड मस्ती हा चित्रपट आला आणि आता ग्रेट ग्रँड मस्ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २२ जुलैला हा चित्रपट रिलीज होणार आहे.