अजरामर `हिल पोरी हिला` एका नव्या धमाकेदार अंदाजात
मुंबई : गायिका आशा भोसले यांची नात असलेल्या झनई भोसले हिनं काही दिवसांपूर्वी तृतीयपंथीयांच्या पहिल्या बँडसोबत एका गाण्याचं रेकॉर्डिंग केलं होतं.
मुंबई : गायिका आशा भोसले यांची नात असलेल्या झनई भोसले हिनं काही दिवसांपूर्वी तृतीयपंथीयांच्या पहिल्या बँडसोबत एका गाण्याचं रेकॉर्डिंग केलं होतं. यशराज फिल्मच्या '6 पॅक बँड' तर्फे हे गाणं तयार करण्यात आलं आहे. आज हे गाणं रिलीज करण्यात आलंय आणि इंटरनेटवर ते सर्वांच्याच पसंतीस उतरतंय.
उषा मंगेशकरांचं अजरामर गाणं असणारं 'हिल पोरी हिला' या गाण्याची धून आणि ते अजरामर शब्द या गाण्यात वापरण्यात आले असले तरी बाकीचे बोल मात्र वेगळे आहे. विशेष म्हणजे या गाण्यात कोणत्याही आधुनिक वाद्यांचा वापर केला गेलेला नाही.