मुंबई : सैराट सिनेमाची झिंग सध्या महाराष्ट्रात सर्वत्र चढली आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली असून परश्या आणि अर्चीची ही लव्हस्टोरी रसिकांनी चांगलीच डोक्यावर घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर चांगलीच झिंग चढली आहे. अजय-अतुलच्या संगिताने सजलेल्या या सिनेमाने बॉक्स आतापर्यंत तब्बल १८ कोटींची कमाई केली आहे. 


सैराटने पहिल्या तीन दिवसांत सुमारे १२ कोटी १० लाखांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर एक नवा रेकॉर्ड केलाय. महाराष्ट्रभर सुमारे ४०० हून अधिक चित्रपटगृहांमध्ये हा सिनेमा झळकतोय.


विकेन्ड हाऊसफुल्ल


सुरुवातीला ८५०० शोज होते. मात्र आता प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहून शोजची संख्या वाढवण्यात आलीय. विकएन्डला सैराटचे जवळपास ९० टक्के शो हाऊसफुल होते. सैराटने आतापर्यंतचे मराठीतील सगळे विक्रम मोडीत काढत आता पर्यंत १८ कोटींची कमाई केली आहे.