मुंबई : अभिनेता नाना पाटेकर यांच्या घरच्या बाप्पालाही निरोप देण्यात आला. गेली ११ दिवस नानाच्या घरी गणेशोत्सवाची धामधूम सुरू होती. भावाच्या निधनामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा केल्याचं नानाने सांगितलं. 


जाहिराती आणि बातमीच्या खाली व्हिडिओ आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 आपल्या संरक्षणासाठी तासनतास उभं राहणा-या पोलिसांवरील हल्ल्यांचा नानानी तीव्र शब्दात निषेध केला.


भावाच्या आठवणीने गहिवरले नाना... 


गणपतीचं खूप करायचा तो थोरला होताना आधार होता आम्हांला. आम्ही तास भावडं सहा गेली आता मी एकटा राहिलो आहे. बाकीची मंडळी त्याची आठवण काढून रडतात मला रडता येत नाही. असं म्हणून भावाच्या आठवणीने नाना गहिवरले. 


पोलिसांवर हल्लाचा निषेध...



कल्याण येथे पीएसआयवर हल्ला करून त्याला तलावात बुडूवून मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल नाना पाटेकर यांनी निषेध व्यक्त केला. ते म्हणाले,  अतिशय गल्लीच्छ प्रकार आहे. पोलिस आहे म्हणून आपण फिरतो आहे. वर्दीच्या मागे तो माणूसच आहे. क्वॉर्टर हे झोपडपट्टीपेक्षा वाईट आहेत, अशा हल्ल्यांचा निकाल १० दिवसात लागला पाहिजे, अशी मागणी  नाना पाटेकर यांनी केली आहे. 


पाहा नानांचा व्हिडिओ