मुंबई: बॉलीवूडमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या चित्रपटांचा गौरव तर आपण नेहमीच ऐकतो. पण घंटा अवॉर्डमध्ये सर्वात वाईट सिनेमांचा गौरव केला जातो. 2016 सालचा घंटा अवॉर्ड मिळाला आहे प्रेम रतन धन पायोला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर याच चित्रपटामध्ये काम केलेल्या सोनम कपूरला सर्वात वाईट अभिनेत्रीचा घंटा अवॉर्ड मिळाला आहे. प्रेम रतन धन पायोच्या टायटल साँग सर्वात वाईट गाणं ठरलं आहे. या चित्रपटात काम करणाऱ्या निल नितीन मुकेशला सर्वात वाईट सह अभिनेत्याचं अवॉर्ड मिळालं आहे. 


दिलवाले चित्रपटामध्ये काम केलेल्या शाहरुख खानला सर्वात वाईट अभिनयाचा घंटा अवॉर्ड मिळालं आहे. शानदार चित्रपटाचा दिग्दर्शक असलेल्या विकास बहल हा सर्वात वाईट दिग्दर्शक आणि हिरोमधून बॉलीवूडमध्ये पदापर्ण करणारा सुरज पांचोलीलाही अवॉर्ड मिळालं आहे.