मुंबई : तब्बल दोन दशकांनंतर 'घायल-वन अगेन' हा  चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलेल्या सनी देओलने प्रेक्षकांना पुन्हा एकदा भुरळ पाडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याने पहिल्या वीक-एंडमध्ये तब्बल २३.२५ कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे. 


बॉया चित्रपटासाठी सनी देओल याने या सिनेमासाठी पैसे जमवण्यासाठी सनीला आपला डबिंग आणि रेकॉर्डिंग स्टुडिओ 'सनी सुपर साऊंड' गहाण ठेवला होता. आता इतकी कमाई केली की हा गहाण ठेवलेला स्टुडिओ सोडवता येणार आहे. 


चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विट करून सांगितले की  #GhayalOnceAgain ने शुक्रवारी ७.२० कोटी, शनिवारी ७.६५ आणि रविवारी ८.४० कोटी अशी एकूण २३.२५ कोटींची भारतीय बाजारात कमाई केली आहे.