मुंबई : सई ताम्हणकर आणि प्रिया बापटचा 'वजनदार' लूक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुपरहॉट सई का बनली चारचौघींसारखी, प्रिया बापटला झालंय काय? लॅन्डमार्क फिल्म्स निर्मित या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियाद्वारे लॉन्च करण्यात आला. हा चित्रपट 11 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. आता या सिनेमातील गाणे रिलिज करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोलू पोलू, तू जशी आहेस तशीच खूप छान आहेस! हे गाण ऐकायला छान वाटते. प्रेमात पडलेला आणि पत्नीवर तेवढेच प्रेम असणारा प्रियकर या निमित्ताने दिसतो. ‘वजनदार’ चित्रपटातून प्रेक्षकांपुढे वजनदार माणसांना टेन्शन असते ते बारीक होण्याचे. जाड असण्यापासून ते बारीक होण्याच्या प्रवासाची मजेदार गोष्ट येणार आहे. हेच या गाण्यातून सूचित करण्यात आले आहे.



हंटर चित्रपटात बोल्ड भूमिका अभिनेत्री सई ताम्हणकरने पार पाडली आणि बॉलिवूडमध्ये सईच्या अभिनयाची चर्चा झाली. वजनदार आणि हंटरमध्ये कदाचित साम्य हे असेल की सई साडीत दिसत आहे.