मुंबई : काही दिवसांपूर्वी एका युवकाला कानाखाली लगावल्यामुळे गोविंदा आता त्या युवकाची बिनशर्त माफी मागणार आहे. आज सुप्रीम कोर्टात गोविंद्याच्या विकिलाने सांगितले की, तो बिनशर्त माफी मागणार असून त्याला ५ लाख रूपये देखील देणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोर्टात त्याच्या वकिलाने सांगितलं की, 'घटनेनंतर १४ दिवसाच्या आतच तो त्या युवकाला भेटला होता. १६ जानेवारी २००८ रोजी गोविंदाने संतोष राय याच्या कानाखाली वाजवली होती. यावर सुप्रीम कोर्टाने कठोर भूमिका घेतली होती.


कोर्टाने म्हटलं की सामान्य माणसाला कानाखाली मारणं शोभत नाही. तुम्ही मोठे कलाकार आहेत तसं मोठं मन पण दाखवा. सुप्रीम कोर्टात याचा व्हिडिओ देखील दाखवण्यात आला होता.