मुंबई : ९०च्या दशकात गोविंदा जितका त्याच्या चित्रपटांसाठी ओळखला जात होता तितकाच तो त्याच्या डान्ससाठी प्रसिद्ध होता. गोविंदाच्या डान्सचे आजही अनेक चाहते आहेत. गोविंदाने जवळजवळ सर्वच अभिनेत्रींसोबत काम केले. मात्र गोविंदाला नीलमसोबत काम करायला अधिक आवडायचे. गोविंदाला तिच्याशी लग्नही करायचे होते. मात्र त्यांची ही जोडी केवळ रील लाईफपुरतीच मर्यादित राहिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोविंदाने १९८६मध्ये आपल्या करियरची सुरुवात केली. इल्जाम हा त्याने केलेला पहिला चित्रपट. हा चित्रपट त्या वर्षातील पाचवा सुपरहिट सिनेमा होता. या चित्रपटाच गोविंदाची हिरोईन म्हणून नीलमने काम केले होते. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आणि पाहता पाहता ही जोडी हिट झाली. लोकांनी या जोडीला डोक्यावर घेतल्यानंतर अनेक चित्रपटाच्या ऑफर्स यांना आल्या. 


यादरम्यान गोविंदा आणि नीलम यांच्यातील जवळीक वाढली. गोविंदा आणि नीलम यांचे करियर चांगले सुरु होते. गोविंदा नीलमच्या बाबतीत गंभीर होता. तो नेहमी तिच्या जवळपास दिसत असते. इतकंच नव्हे तर नीलमने दुसऱ्या कोणत्या हिरोसोबत काम करणे गोविंदाला पसंत नव्हते. मात्र यावेळी गोविंदाच्या आईने त्याच्यासाठी स्थळ आणले. गोविंदाची आईला दिग्दर्शक अनिल सिंह यांच्या पत्नीची बहिण सून म्हणून पसंत होती. त्यांनी गोविंदाला तिच्याशी लग्न करण्यास सांगितले.


त्यावेळी आईचे मन मोडू शकला नाही. त्यामुळे त्याने सर्व काही विसरून सुनिताशी लग्न केले. दरम्यान, गोविंदाच्या लग्नाबाबतची गोष्ट एक वर्ष कोणालाच माहीत नव्हती. गोविंदाला मुलगी झाल्यानंतर त्याने लग्न केल्याची बातमी लोकांना समजली.