OfficialTrailer : `हाफ तिकीट`मधून लहान मुलांचे संवेदनशील भावविश्व
दिग्दर्शक समित कक्कड याने लहान मुलांचे भावविश्व उलगडण्याचा प्रयत्न `हाफ तिकीट` या मराठी सिनेमाच्या माध्यमातून केला आहे. या चित्रपटातून लहान मुलांची संवेदनशील गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबई : दिग्दर्शक समित कक्कड याने लहान मुलांचे भावविश्व उलगडण्याचा प्रयत्न 'हाफ तिकीट' या मराठी सिनेमाच्या माध्यमातून केला आहे. या चित्रपटातून लहान मुलांची संवेदनशील गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
'हाफ तिकीट' या सिनेमाचा ट्रेलर यू-ट्यूबवर लाँन्च करण्यात आलाय. हा ट्रेलर एकदम अंगावर येतो. त्याचवेळी ज्यावयात बागडायचे आणि खेळाचे वय असते त्या वयात या मुलांवर काय प्रसंग ओढवतो. त्यांच्या मनावर कसे ओरखडे ओढले जातात आणि त्यातून त्यांची जिद्द कशी निर्माण होते, हे दाखविण्याचा प्रयत्न दिसतोय.
तो आम्हाला भिकारी बोलला. त्याला कसं कळलं की आम्ही झोपडपट्टीतील आहोत ते. मला फिज्जा पाहिजे, मला पप्पा नको. आणि दादा आपण लय पैसे कमवू आणि मम्मीला देऊ! ट्रेन कोयला, तीन रुपये. आदी संवाद मनाला चिरुन जातात. हा सिनेमा २२ जुलैला रिलीज होत आहे.
पाहा हा ट्रेलर :