पुणे : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. या सिनेमाने लोकांच्या मनावर अक्षरश: गारुड केले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकांनी तर हा चित्रपट एकदा दोनदा नव्हे तर अनेकदा पाहिला. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक रेकॉर्ड या चित्रपटाने मोडले. या चित्रपटामुळे नागराज मंजुळे, आर्ची अर्थात रिंकू राजगुरु, परश्या म्हणजेच आकाश ठोसर यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. 


सैराटच्या वेड्या चाहत्यांपैकीच एक म्हणजे पुण्यातील हनुमंत लोंढे. या व्यक्तीने दोन, तीन, पाचवेळा नव्हे तर तब्बल 105 वेळा सैराट पाहिलाय. 29 एप्रिलला सैराट प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून त्याने सलग 105 वेळा सैराट पाहिलाय. 


हनुमंत लाँड्रीमध्ये काम करतात. त्यांची दिवसाची कमाई 300 रुपये आहे. त्यापैकी दररोज 100 रुपये ते चित्रपटाच्या तिकीटासाठी खर्च करतायत. या 105 शोची तिकीटेही त्यांनी जपून ठेवलीत. हनुमंत यांना नागराज यांच्या चित्रपटाच छोटीशी भूमिका करण्याची इच्छा आहे.